ब्रह्मा, विष्णू, महेश हे जसे उत्पत्ती, स्थिती आणि लय याचे प्रतीक आहेत तसेच Pre, Mains आणि Interview हे तुमचे उत्पत्ती, स्थिती आणि लय याचे प्रतीक आहेत असे समजा. Pre म्हणजे तिथे तुमची उत्पत्ती होते. ती सुरुवात आहे, अर्थात ती तुम्ही उत्तीर्ण करता तेव्हा. Mains मध्ये तुम्ही कुठे stand करता हे समजते, म्हणजेच ती तुमची स्थिती दर्शवते आणि मुलाखतीला आयुक्त, सचिव, जिल्हाधिकारी, तज्ञ मंडळी यांसमोर तुमचा लय होतो. म्हणजेच तिथे तुम्ही यशस्वी तरी व्हाल किंवा सापशिडीप्रमाणे शेवटच्या घराकडून पुन्हा पहिल्या घरात गिळंकृत होऊन याल. म्हणजेच काय की तुम्ही पुन्हा तुमच्या MPSC/UPSC च्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकता.
तुमची Prelims जर निघत नसेल तर तुमचा माहितीतला सराव कमी पडतो. माहिती गोळा करण्यात आणि त्याचा सतत अभ्यास करुन परीक्षेत उतरवण्यात कमी पडता. Pre, Mains आणि Interview हे अनुक्रमे तुमच्या माहितीची, ज्ञानाची आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाची परीक्षा आहे. तुम्ही पूर्व परीक्षा उत्तीर्ण होत नाही म्हणजे तुम्ही माहिती घेण्यात कमी पडत असाल. माहिती तुम्हाला नाही असे म्हणत नाही. माहिती असतात गोष्टी पण माहीत होणे आणि माहीत असणे वेगळे. तुम्ही संपूर्ण पुस्तक वाचले म्हणजे तुम्हाला माहिती होतात गोष्टी, परंतु जोवर त्याचा सराव होत नाही तोवर त्या माहीत असत नाही. ते असणे महत्त्वाचे.
Mains म्हणजेच मुख्य परीक्षा म्हणजे गोळा केलेल्या माहितीमध्ये तुमचे खरेच ज्ञान आहे का हे तपासले जाते. तिथे तुम्हाला अपयश आले तर तुमची माहिती ही वर वर आहे पण त्यात सखोल ज्ञान नसावे.
बरे हे सर्व जरी असेल, मग त्यापुढे तुम्ही त्या माहिती आणि ज्ञानाची उपयोगिता कितपत करु शकता याचा अंदाज तुमच्या बोलण्या-चालण्यातून, तुमच्या विचारांतून आणि एकूणच तुमच्या व्यक्तिमत्त्वातून घेण्याचा अचूक प्रयत्न आयोगाचे अध्यक्ष, आणि इतर तज्ञ सदस्य करतात. एकदा का तिथे यश संपादन केले की तुम्ही या MPSC/UPSC च्या (जन्म-मृत्यूच्या) फेऱ्यातून मुक्त होता.
टिप्पण्या