Porn बघणं म्हणजे माणूस अव्यक्त कृती, कल्पनेच्या माध्यमातून जगण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जेव्हा त्या अव्यक्त कृतींशी संधान बांधून असलेल्या लौकिक इच्छांचा बांध सुटतो तेव्हा समाजाने आखून दिलेल्या नियमांना झुगारून लोक बलात्कार सारखी विकृती करायला धजावतात.
मुंग्यांना खडूने थांबवण्याचा प्रयत्न केला असता ज्या मुंग्या त्या खडूच्या टप्प्यात येतात त्या थोड्याच वेळात मरून जातात. त्यांना वाचवायला एकही मुंगी येत नाही. कारण मुंग्यांमध्ये भावनिकतेचा अभाव असतो. मुंगी ही चिकाटी, जिद्द, सातत्य आणि शिस्त या साठी ओळखली जाते. परंतु भावनाशून्य असल्या तरी त्या मानवापेक्षा जास्त उत्क्रांत आहेत. जरी त्यांनी अंतराळात आपल्या यशाची मोहोर उमटवली नसली तरी. कारण मानवाच्या खुप आधी मुंग्यांना कृषी व्यवस्था अवगत झाली आणि त्यात ते मानवापुढे आहेत असं म्हणणं अतिशयोक्तीचे ठरणार नाही. त्यामुळे त्या सरस ठरतात. तसेच काही मुंग्यांना पंख आहेत. त्या उडू शकतात. त्या तुलनेत मानवाने उत्क्रांतीच्या अवकाशात फारशी अशी काही झेप नाही घेतली. मनुष्यामध्ये पाठीचा कणा सरळ झाला आणि काही सूक्ष्म बदल झाले. त्याने जे काही केले ते त्याच्या बुद्धीच्या जोरावर. याचे कारण म्हणजे मनुष्याने निसर्गानुसार स्वतःमध्ये बदल न घडवता निसर्गाला त्याच्या गरजेनुसार त्याच्या दिमतीला आणून ठेवले. माणूस हा सर्वश्रेष्ठ ठरतो तो यामुळे. पण माणूस हा माणूस ठरतो तो यामुळे नाही. कारण प्राणी जगतातले नियम त्याला लागू होत नाही. जंगलातून आदिम काळात फिरताना वाटेल तेव्हा वाटेल त्या मादा सोबत संभोग ही पद्धत तेव्हाची, जी खुप खुप आधीच संपली. माणूस Civilized (सुसंस्कृत) थोडक्यात स्थिर झाला. आणि वाटेल तेव्हा संभोग या तेव्हाच्या (अ) विचाराशी फारकत घेतली पण नवी घडी बसवण्यासाठी किंवा त्यावर तोडगा म्हणून लग्न संस्था अस्तित्वात आली. त्यामुळे लग्न संस्था म्हणजे प्रजनन करण्यासाठी केलेली सोय नसून शरीर संबंधांचे केलेले नियमन आहे. हेतू जरी पुनरुत्पादन (वंश वाढवणे) असला तरी हा या बसवलेल्या व्यवस्थेचा हेतू प्रत्येकांसाठी असेलच असे नाही.
माणसाला प्राणी जगताचे नियम लागू होत नाहीत कारण प्राण्यांमध्ये दुसऱ्याचे अन्न हिसकावून खाणे अथवा त्या प्राण्यालाच मारून खाणे, स्वतःचे क्षेत्र अधिस्थापित (Territory Maintain) करणे वगैरे असे नियम आहेत. माणूस काही बाबतीत तसे करतो सुद्धा पण काही गोष्टींवर नैतिक, सामाजिक आणि संविधानिक बंधने घालून घेतलेली आहेत. पण तरी देखील माणूस चोरी करतो कारण तो करु शकतो, माणूस बलात्कार करतो कारण तो तसे करु शकतो, माणूस एखाद्याचा जीवही घेतो कारण तसही तो करुच शकतो. आणि असं माणूस का करतो या साठीच एवढी मोठी प्रस्तावना सांगण्याचा अट्टाहास की माणूस हा असाच आहे आणि हाच त्याचा स्वभाव आहे. पण हा स्वभाव माणसाला माणूस ठरवत नाही. म्हणून वारंवार आपण स्वतःला सांगत राहतो की We Are Humans. प्राणी जरी असलो तरी प्राण्यांपासून आपण कधीच वेगळे झालो आहोत त्यामुळे सोयीसोयीने आपण प्राणीच आहोत हा संदर्भ देणे संयुक्तिक ठरत नाही.
बदलापूरला झालेल्या अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराची बातमी देशभर समजली. अशा अनेक बातम्या रोजच ऐकायला मिळतात. जगभरातून अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. का करतात हे लोक असे? महिलांवरील अत्याचार आणि नंतर त्यांचा खून करणे, एकतर्फी प्रेमातून रस्त्यावरुन मुलींचा पाठलाग करून धारधार हत्यार त्यांवर उगारणे, अल्पवयीन मुली सुद्धा यापासून वाचल्या नाहीत. याचं दुःख हे केवळ कल्पनेपलीकडचं. आता तर या गोष्टी बातम्यांमध्ये वाचून, ऐकून, पाहून लोकांनाही सवय झाली आहे इतकं लोक ती बातमी सहज दुर्लक्ष करत आहेत, वृत्तपत्राचे पान उलटत आहेत. एवढे या घटनांचे प्रमाण वाढले.
या गुन्ह्यांचा संबंध हा भावनेशी आहे. पण ही सुद्धा भावना एकतर्फी आहे. खोलात जाऊन विचार केलात तर लक्षात येईल सर्व गुन्हे हे वासनेपाई घडतात. वासना माणसाला काहीही करायला लावू शकते. आणि सर्व वासनांमध्ये काम वासना ही प्रबळ. त्याचा प्रतिकार करण्यात माणूस हरतो तेव्हा तो माणूसपण या गोष्टीला काळीमा लागेल असे गुन्हे करतो. स्वतःच्या मनात बळावलेल्या कामवासनेचा प्रतिशोध तो घेऊ लागतो. इथे समाजमाध्यमे त्याच्या डोक्यात खुप कल्पना आणि विचार भरतात आणि या सर्वांत Porn Industry अग्रेसर आहे. त्यांचा हेतू जरी मनोरंजन असला तरी माणूस हा स्वैर विचार करतो. "Porn बघणं म्हणजे माणूस अव्यक्त कृती, कल्पनेच्या माध्यमातून जगण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जेव्हा त्या अव्यक्त कृतींशी संधान बांधून असलेल्या लौकिक इच्छांचा बांध सुटतो तेव्हा समाजाने आखून दिलेल्या नियमांना झुगारुन लोक बलात्कार सारखी विकृती करायला धजावतात." "अशा सर्व लोकांची समोरच्याप्रती असलेली वेदनेची जाणीव ही शून्य असते." त्यामुळे ही असंवेदनशील माणसे असे अमानवी कृत्य करतात. या सर्व घटना कठोर कायदे आणल्याने कमी नक्कीच होतील पण समूळ नष्ट होणार नाही. समूळ नष्ट करणे म्हणजे गुन्ह्याच्या आणि गुन्हेगाराच्या तळाशी जाणे कारण होणारा गुन्हा हा आधी मनात पूर्ण होतो. तिथे तो सर्वप्रथम आकार घेऊ लागतो.
इतका खोलात जाऊन विचार करावा लागणारच. वरवर कायदे आणून मग त्याचा अंमल करणे या गोष्टी गरजेच्या आहेतच पण विष जर माणसाच्या मनातच तयार होत असेल तर त्या विषावर विषविरोधी लस बनवून उपयोग काय! माणसाच्या मनात तयार होणारे विष थांबले की त्या विषाचा दंशही होणार नाही आणि दाह सुद्धा होणार नाही
धर्माची उत्पत्ती या आणि यासारख्या गोष्टींना घेऊनच झाली असे माझे मत. विस्तारलेली लोकसंख्या, हा प्रचंड जनसमुदाय आणि त्यामुळेच ही अनियंत्रित व्यवस्था. कारण जेवढी लोकसंख्या वाढणार तेवढाच बेशिस्तपणाही वाढतच जाणार. तर अशा या अनियंत्रित व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी माणसाने धर्म निर्माण केला. आणि या धर्मात जगण्याची रीत सांगितली आहे. धर्म म्हणजे हिंदू नाही की इस्लाम नाही, धर्म म्हणजे माणसाचा स्वभाव. माणसाने माणसा सारखे वागणे आणि इतरांना वागवणे. पूर्वी धर्माचा हाच अर्थ होता. धर्मांमध्ये मनुष्याने आपले आयुष्य दुःखमुक्तपणे कसे घालवावे याचे विवेचन केले. हे करताना पुण्य कसे गोळा करावे आणि एक छान सदाचारी आचरण असे अंगिकारावे याबद्दल उहापोह हा प्रत्येक धर्म आणि त्या त्या काळातल्या धर्मगुरूंनी केला. त्यांच्या या गोष्टी लोक धर्म साहित्यातून अनुभवून त्याचे पालन करतात. पण माणूस जेव्हा निधर्मी होतो तेव्हा तो अविवेकी होतो आणि अविवेकी माणसेच दुष्कृत्य करतात. त्यामुळे धर्मपालन महत्त्वाचे ठरते ते यामुळेच. जुन्या पिढीने फार सुंदर वारसा मागे सोडला आहे. त्यांनी सारासार विचार करुन काही मौलिक विचारांचे धर्माच्या रुपात जतन केले. नामस्मरण, ध्यान / उपासना / विपश्शना (Meditation) या काही मूलभूत पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. ज्या माणसाला वाईट विचार आणि विकृतीपासून कोसो दूर ठेवतात. तुम्ही कोणत्याही धर्माचे पालन करा. सर्व धर्म काही मूलभूत गोष्टींचाच संस्कार मनुष्यावर करतात. त्यांचा अंगीकार केला तर निरोगी आणि दुःखमुक्त आयुष्य मनुष्य जगतो आणि शेवटी सर्वार्थाने मुक्त होतो. ही दुःख मुक्ती आपल्या मनाला सतावणाऱ्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरीपूंपासून असते. एकदा का नैतिक अधिष्ठान आले की माणूस दुःखमुक्त होतो.
काहींना या गोष्टी ऐकून माझ्या या बोलण्याला महत्व द्यावं वाटणार नाही कदाचित. पण आपल्यात छोट्यात छोट्या आणि मोठ्यात मोठ्या समस्यांचे उपाय हे सर्व आपल्या मनात आहेत कारण त्यांचा उगम हा मनापासून होतो आणि तिथेच त्यांचा शेवटही होतो. तुम्ही गौतम बुद्ध वाचा, महावीर वाचा, शिखांचे धर्मज्ञान पाहा, येशू ख्रिस्त घ्या किंवा मोहम्मद पैगंबर जाणून घेण्याचा प्रयत्न करा, सर्व लोकांनी हेच सांगितले आहे. आपल्या महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास वेदांपासून तर गीता, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, दासबोध, संतांचे अभंग, कीर्तन सर्व ठिकाणचे साहित्य, प्रवचन, ओव्या या सर्वांतून एक विचार निघतो ज्याचे उगम आहे मन. तिथे सद्विचारांचे बीज पेरले की विवेकाचे अधिष्ठान प्राप्त होते आणि असा विवेकी माणूस स्वतःचा तोल हलू देत नाही.
काहींना या गोष्टी ऐकून माझ्या या बोलण्याला महत्व द्यावं वाटणार नाही कदाचित. पण आपल्यात छोट्यात छोट्या आणि मोठ्यात मोठ्या समस्यांचे उपाय हे सर्व आपल्या मनात आहेत कारण त्यांचा उगम हा मनापासून होतो आणि तिथेच त्यांचा शेवटही होतो. तुम्ही गौतम बुद्ध वाचा, महावीर वाचा, शिखांचे धर्मज्ञान पाहा, येशू ख्रिस्त घ्या किंवा मोहम्मद पैगंबर जाणून घेण्याचा प्रयत्न करा, सर्व लोकांनी हेच सांगितले आहे. आपल्या महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास वेदांपासून तर गीता, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, दासबोध, संतांचे अभंग, कीर्तन सर्व ठिकाणचे साहित्य, प्रवचन, ओव्या या सर्वांतून एक विचार निघतो ज्याचे उगम आहे मन. तिथे सद्विचारांचे बीज पेरले की विवेकाचे अधिष्ठान प्राप्त होते आणि असा विवेकी माणूस स्वतःचा तोल हलू देत नाही.
हे झालं धर्माबाबत. प्रत्येक माणूस धर्म आदी गोष्टींमधे विश्वास ठेवेलच असे नाही. मग यावर उपाय काय? हल्ली अशा घटनांमध्ये अल्पवयीन मुले देखील बलात्कारासारख्या कृतीत गुन्हेगार सिद्ध झाल्याचे दिसून येतात. का असं होतंय ते तर मी सांगितलच आता, पण याची सुरुवात लहान वयात होते. म्हणजे पौगंडावस्थेत शरीरात होणाऱ्या बदलांपासून, मनात निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्न व त्यातून या मुलांनी स्वतःची स्वतःच शोधलेली उत्तरे. त्यासाठी मुलांना वाढीच्या वयातच त्यांवर संस्कार करणे जेणेकरून त्याचा प्रभाव त्यांवर चपखल बसतो आणि पुढे जाऊन गोष्टी पालकांच्या आणि मुलांच्याही हाताबाहेर जात नाहीत.
सरकारने यासाठी लैंगिक शिक्षण कार्यक्रम शाळांमधून राबवायला सुरुवात केली पण त्यामध्येही बऱ्याच मर्यादा येतात. बऱ्याच ठिकाणी एक दिवसीय तेही वर्गातल्या एका तासिकेत हे कार्यक्रम आटोपते घेतले जातात. त्यात मुलांना किती कळतं, त्यांच्या मनातले सर्व प्रश्न सुटतात का, हे नाही पाहिले जात. शिवाय त्यात एड्स सारख्या रोगांवर जास्त लक्ष केंद्रित केलेलं असतं. तर या कार्यक्रमात काही बदल होणे गरजेचे. असो.. मुद्दा लक्षात आलाच असेल की स्त्री समानतेचे प्रमाण सर्व ठिकाणी असमान आहे कारण पुरुषसत्ताक परंपरा आहे ना, मग स्त्रीचे अस्तित्व दडपून टाकणे आणि तिला तिची जागा दाखवून देणे या विचारात माणसाची मती भ्रष्ट झाली आहे. यासाठी मुळावर घाव नाही तर उपचार होणे गरजेचे. तरच मनुष्य नावाचे वटवृक्ष बहरेल अन्यथा त्याचे घायपात होईल. त्यासाठी पालकांकडून संस्कार होणे, पालकांच्या सावलीतून बाहेर शाळा, महाविद्यालय इथे असताना ते काम जितके शिक्षकांचे तितकेच ते समाजाचे आणि समाज या नात्याने तुमचे आमचे सर्वांचे आहे. आणि अशा सुधारलेल्या समाजातून तो जेव्हा चालेल तेव्हाच त्या माणसाला हे कळेल की एखादी स्त्री कमी कपड्यांमध्ये समोरुन येत जरी असेल तरी तिला हात लावण्याचा कोणताच अधिकार पुरुषाला नसतो. कारण वैयक्तिक आयुष्य निवडीचं स्वातंत्र्य हे समाजातल्या प्रत्येक घटकाला जसे आहे तसे ते महिलांना देखील आहे.
महिला समानता दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा.
टिप्पण्या