स्वैर कविता


 एक दिवस अचानक आली ती
उधाणल्यासारखी बरसली ती
पावसाची सर नव्हती पण
वाऱ्याची लाट होती ती
शृंगार भरला होता जसा
कस्तुरी मनी दरवळली जशी
विसरली होती सर्व क्षण
आठवणींबद्दल म्हणाली ती, आणि
आठवले जेव्हा सारे तिला
आठवणींनी उधाणली ती.
- मयुर

टिप्पण्या