प्रेमसंबंध/संभोग आदीचे (मनात इच्छा निर्माण होण्याचे, संप्रेरके धावण्याचे) वय १८ आणि लग्न होण्याचे वय २८-३० किंवा त्याहीपेक्षा जास्त. मग हा जो १०-१२ वर्षांचा कालावधी मधे आहे तो कसा निघणार. त्यामुळे समाजाला इथे प्रेमसंबंधांच्या बाबतीत लवचिकता दाखवावी लागणार कारण त्याला काही पर्याय नाही. नाहीतर वैश्या वृत्ती सुरू होण्याला कोणीच थांबवू शकत नाही. कारण नदी जसा मार्ग काढते तसा माणूसही काढतोच. आणि जर माणसावर सामाजिक-नैतिक नियम घातले तर नदीवर बांध घातल्यावर जे होते तेच माणसाचेही होणार. एकतर पाणी गावांना अतिशय लागणार किंवा बांध फुटणार. त्याचप्रमाणे माणूसही त्याचे त्याचे मार्ग शोधून काढून समाधानी होण्यासाठी प्रयत्न करणारच.
टिप्पण्या