दिनांक. ८ मार्च २०१८
प्रिय मैत्रीण,
पत्र लिहिण्यास कारण की, आज जागतिक महिला दिन.. तेवढेच एक निमित्त ! हा मुद्दा समोर आला की माझ्यापुढे माझी आई, आपल्या देशातील स्त्रिया आणि माझी मैत्रीण हे डोळ्यासमोर येतात. आई हा माझा नेहमीच जिव्हाळ्याचा विषय राहिलाय. मी माझ्या असण्याचं, यशाचं आणि आनंदाचं सारं सर्व श्रेय माझ्या आईस देतो आणि तितकंच बाबांनाही. तिच्याबद्दल मला प्रचंड आदर. खुलासा करायचाच झाला तर तिची स्वप्नं पूर्ण करणे हेच माझे स्वप्न. तिने तिची स्वप्ने माझ्यावर कधी लादली नाहीत, कारण तिचं तर स्वप्नच मी आहे. तर हे झालं माझ्या आईबद्दल.
त्यानंतर भारतातील स्त्रिया म्हटलं की मला दयाही येते, अभिमानही वाटतो आणि मग एकूणच रागही येतो. बरेच मुद्दे लगोलग समोर येतात - पूर्वापार चालत आलेली पुरुषप्रधान संस्कृती त्यात तेवढी प्रामुख्याने, देशातील स्त्री साक्षरता प्रमाण हे ७० % सुध्दा नाही, स्त्री जन्म नको त्यामुळे स्त्री-भ्रूण हत्या इत्यादी इत्यादी... आणि मग जोडीने पुढे येणारा वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरलेला मोठ्या आणि ठळक अक्षरातील विषय - " महिला सक्षमीकरण "
एका संध्याकाळी अक्षय्य सोबत फिरत असताना त्याला सहज विचारलं, Women Empowerment बद्दल तुला काय वाटतं ? तो लगेच बोलला, " 'विचारातच नाही आपल्या' तर कोठून येणार Women Empowerment ! आणि नसेल खरं वाटत तर विचारावं स्वत:ला प्रामाणिकपणे की आपण आपल्या घरात आपल्या आईला, बायकोला आणि बाहेर मैत्रिणीला आणि इतर स्त्रियांना कसे वागवतो ते ! " त्याचं ते बोलणं फार सटीक होतं. आपल्या इथे Women Empowerment म्हणजे मुलींनी रात्री पार्ट्या करणे, मुलांसोबत उभे राहून सिगारेटी ओढणे, मोटारसायकल चालवणे यांसारख्या गोष्टी प्रचलित होताना दिसताहेत. खरेतर यात सामुहिक तर नाहीच परंतु वैयक्तिक प्रगतिचाही साधा लवलेशही नाही. I think Women is taking liberty in a wrong way !
दुसऱ्या बाजुला मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेश - बिहारमधून आलेल्या आणि शहरात किराणा मालाच्या दुकानांच्या गल्ल्यावर बसणाऱ्या व एखादं 'चिप्सचं पाकीट' मागितल्यावर ते फाडून देणाऱ्या महिला (अर्थात हे या पत्रापुरता केलेलं आकलन) यासाठी आणि त्यांच्या या मागासलेपणा व अशिक्षितपणासाठी पुरुषप्रधान संस्कृती आणि सरकार हे खरेच हेच आणि एवढेच घटक जबाबदार आहेत का ? आणि जर तसं त्यांना जबाबदार धरलेच तर मग ही परिस्थिती कधीच सुधारणार नाही. मुळातच महिला सक्षमीकरण म्हणजे सत्ताधारी सरकार व निव्वळ फावल्या वेळेत करमणूक म्हणून उभारले गेलेले NGO यांनी महिला दिनाच्या दिवशीच Women Empowerment च्या नावाने कार्यक्रम, योजना राबवणे व महिलांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य, अशी सर्वांगीण प्रगती सुधारणे ही धारणा ठेवून सारे वाट पाहत बसतात की 'अच्छे दिन' येतील, 'भारताचा न्यूयॅार्क होईल !'
महिला सक्षमीकरण म्हणजे तो अर्थ नाहीच. तर त्या महिलेने स्वत:च स्वत:ची मदत करणे इतका तो सरळ आहे. स्त्री-भ्रूण हत्या करुन फक्त पुरुषांचीच संख्या वाढवली तर रात्री बेरात्री एकट्याने घरी जाणाऱ्या लोकसंख्येने Minority मध्येच असणाऱ्या स्त्रियांवर त्याच पुरुषांची वाकडी नजर ही पडणारच. त्यामुळेच स्त्रियांचे पुरुषांबरोबरीचे गुणोत्तरी प्रमाणाचा मुद्दा येथे महत्त्वाचा ठरतो. शिक्षण आणि त्या शिक्षणाला जोडून असलेले कोणतेतरी कौशल्य असावे. नसल्यास एखादे अवगत तरी करावे. शिक्षण हा एकमेव उपाय आहे. माझ्या आवडत्या वक्त्याचे एक छान वाक्य आहे. - शिकले पाहिजे, वाचले पाहिजे, वाचनाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कधीही कोणासमोर नतमस्तक होत नाही. आपली मदत फक्त आपणच करु शकतो ती दुसरं कोणीही करु शकत नाही. त्यामुळे सरकार आणि समाजाला दोषारोप लावणे सोडून स्वत:तल्या उणिवांना मान्य करुन त्यात सुधारणा करणे जास्त गरजेचे आहे. आणि सुविधा व संधीचं म्हणाल तर हिंदुस्थानात सावित्रीबाई फुले आणि पाकिस्तानात मलाला युसुफजाई यांना तरी काय उपलब्ध होतं ! पण 'आपल्याकडे' आणि 'आपल्याजवळ' काहीच आणि कोणीच नाही अशी फिकीर न करता या 'स्त्रियांनी' दोन्ही देशात शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवली.
आज देशात सर्व क्षेत्रात मोठमोठ्या स्थानांवर महिला विराजमान आहेतच पण त्या तितक्याच पुरेशा आहेत काय ? देशाच्या आणि राज्याच्या कायदेमंडळात स्त्रियांचे प्रमाण अगदी जेमतेम आहे ( ५० % आरक्षण असूनही ) त्यामुळे स्त्रियांचे मूलभूत प्रश्न चर्चेत नाहीत वा त्यांना मोठा Platform मिळत नाही. स्त्रियांनी विधायक ध्येयासाठी कार्य करायला संघटीत होणे हीच ती काळाची गरज आहे पण आपल्या इथे स्त्रिया ह्या 'हळदीकुंकू' सारख्या समारंभात संघटीत होतात. तिथे काय चालतं हा मुद्दा वेगळा पण सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे यांना हा अभिनव कार्यक्रम कशासाठी सुरु केला होता याचाही विचार झाला पाहिजे.
अगदी तात्त्विक विवेचन कारायचे झाल्यास व्यक्ती नगरात - देशात जन्माला आल्यानंतर शेवटपर्यंत सक्षम असूनही स्वत:ला असक्षम मानून काही काम, नोकरी, उद्दोग न करता बेरोजगार राहत असेल तर ती व्यक्ती देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोजा असते. तो बोज समाजातील इतर कार्यकारी/करदाता वर्गावर येतो. त्यामुळे महिलांनी स्वत:ला इतरांच्या बरोबरीने आणि मग त्यांच्या पुढे धावतं करुन प्रज्वलित केले पाहिजे. प्रत्येक स्त्रिच्या कामाला तिच्या योगदानाबद्दल एक 'अर्थ ' मूल्य एक Economic Value असलीच पाहिजे नाहीतर समाजात तर राहूच द्या ओ...! पण घरात सुध्दा त्यांना किंमत दिली जात नाही. त्यामुळे परंपरागत अबला, कमकुवत अशी मानसिक वृत्ती झटकून स्वत:चं अस्तित्त्व सिध्द करण्यासाठी स्वत:नेच स्वत:ला चालना देणे गरजेचे आहे.
मैत्रीण... स्वप्न पाहावीत गं, आणि मोठीच पाहावीत. आणि मग ती प्राप्त करण्याचा ध्यासही हवा. आपली धाव कुंपणापर्यंतच का असावी ? मर्यादांचा विचार करुन लहान स्वप्न पाहतो ती स्वप्न नसून त्या फक्त इच्छा असतात. खरेतर मर्यादांच्या पुढे जाऊन विचार व्हायला हवा. सोसायटीच्या महिला मंडळाची अध्यक्ष होणं ही झाली इच्छा आणि एका महिलेने देशाची पंतप्रधान इंदिरा गांधी होऊन देशाला 'Lead' करणं, नेतृत्त्व करणं आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचं इतर राष्ट्रांसमोर प्रतिनिधित्त्व करणं हे झालं स्वप्न. So think like a queen, a queen is not afraid to fail, because failure is another steppingstone to greatness.
तुला जागतिक महिला दिनाच्या आदरपूर्वक शुभेच्छा ! तुझ्या स्वप्नांना यश मिळण्यासाठीही मन:पूर्वक शुभेच्छा...
कळावे,
- मित्रा

टिप्पण्या