"आपण रस्त्यावरुन चाललेलो असतो. घर ते ऑफिस / काॅलेज या दोन गोष्टी तशा ठिक आहेत पण या दोहोंमधील अंतर ? तो रस्ता.. तो कधीच आपल्या आोळखीचा झालेला नसतो. कधी कधी रस्त्यावरुन चालताना विचार येतात की आपण या रस्त्यावर भोवळ येऊन पडून राहिलो तर.. तर काय होईल ? असंख्य पाय आपल्या आजुबाजुने चालत राहतील. कोणी आपल्याकडे लक्ष देईल का.. की ते तसेच आपल्याकडे दुर्लक्ष करुन चालत राहतील..?"
आपलं दु:ख समजण्यासाठी समोरचा माणूस पण तसा संवेदनशील मनाचा, समजुतदार असावा लागतो, की ज्याला समोरच्याचं मन वाचता येईल. निदान समोरची व्यक्ती दु:खात आहे, तिला प्रचंड मानसिक वेदना होत आहेत, दु:खाने ती विव्हळते पण एखादा आपल्याच तंद्रीत चाललेला असतो. या गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचत नसतात किंवा त्यांचं व्यक्तिमत्वच तसं असतं की या गोष्टी ते सहज दुर्लक्ष करतात. आपलं काय.. कोणी आपल्या दु:खाकडे पाहत नाही, आपल्याला समजून घेत नाही किंवा आपली काळजी करण्यासारखंच कोणी उरलेलं नसतं म्हणून आपण स्वत:च स्वत:च्या काळजीत असतो. पण असं नाही व्हायला पाहिजे खरेतर.. एखाद्याचं दु:ख समजू शकतील अशी माणसं खुप कमी आहेत. म्हणजे आपली मुलगी अनेक दिवस घरात गप्प मलूल बसून आहे, काॅलेजमध्ये पण उदासच असते तर तिला समजून घेण्याचा प्रयत्न कोणी मनापासून करत नाही. तिचे आई वडील हे जरी करत असले तरी generation gap मुळे अडचणी येतात. आई बाप एका मर्यादेपलीकडे मुलीला नाही समजून घेत. मित्र मैत्रिणींमध्ये पण हल्ली फारसं कोणी समजूतदार mature friends नसतात. प्रत्येकाला आपापली पडलेली असते. Boyfriend/Girlfriend मध्येही त्यामुळेच एक जण नेहमीच खुप दु:खी असतो. कारण दोघांमध्ये तशी understanding नसते. मतभेद असतात. पण त्यांच्यातही कोणीतरी एकाने समजुतदारपणा नाही दाखवला तर त्यांच्याही नात्यातली रेघ पुसट होत जाते.
या जगात आनंदी माणसे अनेक आहेत आणि दु:खीतांची संख्या minority मध्ये येते. प्रत्येकाला आनंद हवा असतो. दु:खी राहायला कोणालाच नाही आवडत. त्यामुळे लोक जिथून आनंद मिळतो तिथे धावतात आणि त्यामुळेच दु:खी व्यक्ती ही अशी कोपऱ्यात मागासलेली बनून राहते. खरेतर समोरच्याला आपलं दु:ख नाही समजू शकत त्याचं हेच कारण आहे म्हणून आपल्याला आपलं दु:ख स्वत:शीच कुरवाळत बसावं लागतं. याचं आणखी एक कारण की जे लोक आपल्याला नाही समजून घेऊ शकत ते जादातर extrovert म्हणजेच बहिर्मुख प्रवृत्तीचे असतात. त्यामुळे शांतपणे समोरच्याला समजून घेणे हे त्यांच्या स्वभावातच येत नाही. पण असे काही संवेदनशील असतात ज्याला आपण introvert अंतर्मुख म्हणतो. त्या प्रवृत्तीचे लोक फार कमी असतात आणि त्यांना समजत असतं सगळं कारण ते सुध्दा या दु:खातून गेलेले असतात.
संत तुकाराम म्हणतात की - "कवीचे काळीज म्हणजे समाजातील दु:ख लपवण्याचा एक कोनाडा आहे." ग्रेस म्हणतात की - " I am born with depression and I will die along with depression." म्हणजे या कवी लोकांनी एवढे दु:ख पचवले आहे पण लोक जेव्हा त्यांच्या कविता वाचून आनंदी होतात, त्यांची वाह..वा.. करतात मात्र त्यापलीकडे कोणी जात नाही. कवींनी त्यांच्या कवितेतील दु:खातून त्यांचे खरे आयुष्य चितारलेलं असतं. हे लोकांच्या आणि रसिकांच्या लक्षात येत नाही. त्याबद्दल कोणी हळवं होऊन त्या कवीली विचारायला जातही नाही की काय झालं रे बाबा ? तु एवढा दु:खी का ? मी काही मदत करु शकतो का ? असं कोणी बोलत नाही कारण त्यांना त्यांच्या comfort zone मध्येच सुख वाटतं. पण त्या दु:खाला वाहिलेलो माणूस हा याचक बनतो.
आणि लोक स्वत:हून नाही विचारत की तु दु:खी का आहेस ? पण जे विचारतात, अगदी मनापासून.. ते खरे असतात. त्यांची साथ कायम मिळाली तर आयुष्य सुंदर आहे, मग तेच आपले आयुष्य सुंदर बनवतात आणि अशा लोकांना नक्की स्वत:च्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान दिले पाहिजे. तेव्हा मग दु:ख जाईल की नाही हे महत्वाचं उरणार नाही पण ते दु:ख कमी नक्की होईल आणि जर नसेलच असे कोणी तर मग आपणच आपल्या दु:खांवर प्रेम करावं आणि सर्वांपासून अलिप्त अशा कुपीत बंद करुन ठेवावं. निदान आपल्या नजरेत तरी आपल्या दु:खाला अत्तराचा मान मिळेल.

" ज्याचे त्याने घ्यावे ओंजळीत पाणी, कुणासाठी कोणी थांबू नये असे उणे नभ ज्यात तुझा धर्म, माझे मीही मर्म स्पर्शू नये.. " - ग्रेस |
टिप्पण्या