"त्या रिकाम्या बाकांवर गर्दी करुन बसणं,
त्यावर आपली गुपितं लपून कोरणं,
तिथून आपल्या स्वप्नातल्या तिला पाहणं,
तर कधी त्या बाकावरुन प्रश्नाला उठवलं जाणं..,"
"आता ते दिवस खुप आठवतात,
कधी त्या रिकाम्या वर्गात पुन्हा गेलो की
ते बाक पुन्हा मनात भरुन येतात..,"
"पूर्वीसारखंच त्या बाकांवर तिघांनी बसावसं वाटतं,
पण आता त्यावर फक्त आठवणींची धूळ जमलेली दिसते...."
"ती धूळ बाजूला सारली की त्या दिवसात कोरलेली नावे त्या सुंदर क्षणांची आठवण करुन देतात..
आणि मग आपली मने अश्रूंनी भरुन येतात...."
- मयुर
- मयुर
११वी आणि १२वी सायन्स C २०११-१२ ची बॅच काॅलेज सुटलं, सगळे आपापल्या मार्गी लागले.. आठवणी मात्र तशाच आहेत. |
टिप्पण्या