"माझे आयुष्य म्हणजे अप्रिय घटनांची भलीथोरली उतरंड आहे." हे वाक्य मी कुठेतरी वाचलं होतं. त्या वाक्याचा पाषाणस्पर्शही माझ्या जीवनाला झाला आणि मला पुन्हा एकदा त्याने विचारांच्या खोल दरीत पाडले. मला कोणी ओळखत नाही कारण मी एकांतवासी आहे. त्यामुळे माझ्याबद्दल कोणाला माहीत नसणे स्वाभाविक आहे. पण त्याहीपलीकडे जाऊन कोणतीही व्यक्ती कितीही आत्ममग्न असली जरी तरी ती आत्ममग्नही का आहे असा विचार एखादा माणूस तरी करतोच ना.. मला वाटायचं की हे एका मर्यादेपलीकडे जाऊन चुकतय. कारण तो बोललाच नाही तर कळणार कसा? स्वत:च्या धुंदीत बेधुंद राहून अंतर्मनाने बाह्यजगताचा वेध घेण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळे समाजशील वाटत असला तरी तसा तो नाही. मग त्याचे एकूणच जगणे आणि त्याचे तथाकथित लिखणे हेही त्याच अंगाणे पुढे सरकत जाते. कधी कधी वाटतं का आपल्या एकलकोंड्या स्वभावमुळेच की काय आपल्यात तसा रस कोणी घेत नसावा म्हणून त्याची आजुबाजुच्या त्या तथाकथित समाजाविषयाची त्याची प्रतिमा थोडी काळ बाजुला ठेवून आणि स्वत:ला समोरच्या आकर्षक भासणाऱ्या वातावरणात झोकून देऊन निखळ आनंदाने, प्रसन्नतेने लोकांत मिसळण्याचा प्रयत्न तो करतो. पण त्याचे ते अथक प्रयत्न त्याला अपयशीही करतात. कारण तिथून तो नाकारला जातो आणि याचे त्याला खुप दु:खही होते. पण ते दु:ख नाकारले गेल्याचे नसते; तो काय आहे, त्याच्या भावना काय आहेत, त्याच्या इच्छा काय आहेत, इतकच नाही तर त्याला काय वाटतं याचा थोडाही विचार न करता त्याला दूर लोटावं. त्याला समजून घेण्याचा प्रयत्नच आजवर कोणाकडून झाला नाही. खरेतर त्याला समजून घेण्याआधी त्याला जाणूनसुध्दा घेतलं नाही. आपल्या इच्छेच्या ठिकाणी जाण्याची त्याची ओढ होती पण तो नाकारला गेला क्षणातच. त्याला चिंता सतावत होती अशी की आपण 'अपात्र' ठरलो. पण खरं सांगू का.. तो योग्यच होता, पात्रच होता, कही अधिक पटीने परीपूर्ण असा होता पण "लोकांना चांगल्या गोष्टी निवडताच येत नाहीत, त्यांना जर चांगल्या गोष्टी निवडता आल्या असत्या तर आज तो एकटा नसता."
टिप्पण्या