माझे मन तिचे मन
दुखले तुटले पार मिटले
दोघांचे ते नाजूक मन
हात सुटे क्षणात झाले
शब्द नमते मनात झाले
तिचे मन माझे मन
सांडले माखले पार विटले
दोघांचे ते अधीर मन
उत्सुक होते दोघे मन
चुकीचे होते दोघे जण
हात एकाचे पडते झाले
जीव दोघांचे रडते झाले
तिचे मन माझे मन
त्रस्त झाले नष्ट झाले
दोघांचे ते निष्पाप मन
कोशात गेले दोघे जण
कोसत होते दोघे मन
काय केले व्यस्त झाले
दुःख सारे स्वस्त झाले
काळजापार वार झाले
त्याच क्षणी ठार झाले
तिचे मन माझे मन
रडू लागले पडू लागले
दोघांचे ते हळवे मन
मनांचे उडाले धुलीकण
धुळीत मिळले सुखी क्षण
नाते क्षणात एकटे झाले
दुःख मनात पेटते झाले
आधी दोघांचे दुःख एक
सुखी मनांचे मन एक
आता दोघे मन एकटे झाले
तिचेही माझेही...
टिप्पण्या